

सध्या फाइझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लशीची सर्वत्र चर्चा सुरू आहे, ती कोरोना लशीमुळे. ज्या फाइझर कंपनीनं प्रभावी अशी कोरोना लस दिली आहे, त्याच कंपनीनं जगाला वायग्राही दिला आहे.


आज कोरोना लशीसाठी चर्चेत असलेली फाइझर कंपनी 22 वर्षांपूर्वीदेखील ही कंपनी चर्चेत होती, याचं कारण म्हणजे वायग्रा. या कंपनीकडून नकळतपणे वायग्राचा शोध लागला होता.


यानंतर कंपनीनं 1990 साली या औषधाची चाचणी माणसांवर केली. त्यावेळी जॉन ला मॅटिना फायझर कंपनीचे रिसर्च आणि डेव्हलमेंट टीमचे प्रमुख होते.


फाइझर कंपनी हाय ब्लड प्रेशर आणि हृदयाच्या आजाराशी संबंधित उपचारासाठी औषधांचं ट्रायल घेत होतं. या औषधाचं प्राण्यांवर ट्रायल करण्यात आलं तेव्हा त्याचा पिरणाम चांगला दिसून आळा. याचे काही दुष्परिणामही नव्हते.


आज तकच्या रिपोर्टनुसार मॅटिना यांनी सांगितलं होतं की, ट्रायलदरम्यान ज्या रुग्णांना हे औषध देण्यात आलं त्यांचं नीट निरीक्षण केलं जातं होतं. नर्सनं काही रुग्णांना ट्रायलदरम्यान पोटावर झोपताना पाहिलं, ते लोक अस्वस्थही होते. नर्सनं याची माहिती डॉक्टरांना दिली. डॉक्टरांनी तपासणी केली असता हे औषध हृदयासंबंधी आजार आणि हाय ब्लड प्रेशरपेक्षा नपुसंकतेच्या समस्येवर जास्त प्रभावी ठरत होतं.


1998 मध्ये या औषधाला अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं इरेक्टाइल डिस्फंक्शनचं औषध म्हणून मान्यता दिली आणि आता जगातील हे लोकप्रिय औषध आहे.