Home » photogallery » lifestyle » PARENTING TIPS HOW TO TAKE CARE OF BABIES IN SUMMER RP

Baby care in Summer: कडाक्याच्या उन्हाळ्यात लहान मुलांची अशी घ्या काळजी; होणार नाही कसलाही त्रास

Parenting Tips: मे महिना सुरू झाल्यापासून उष्णतेने अधिकच कहर करायला सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांबरोबरच ज्येष्ठांचीही विशेष काळजी घेण्याची नितांत गरज आहे. विशेषतः मे आणि जूनच्या कडक उन्हापासून मुलांना सुरक्षित ठेवणं हे पालकांसाठी आव्हानात्मक काम आहे. नवजात बाळ असेल तर उष्णतेची फार काळजी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत मुलाला उष्णतेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. वास्तविक, लहान मुलं शारीरिकदृष्ट्या खूप नाजूक असतात. त्यामुळे उन्हाळ्यातील कडक ऊन आणि प्राणघातक उष्णतेचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर तसेच त्यांच्या नाजूक त्वचेवर होतो. मुलांची विशेष काळजी घेण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेऊया.

  • |