पुन्हा सुरू होणार Oxford च्या कोरोना लशीची चाचणी; का थांबवलं होतं कंपनीने ट्रायल वाचा
ऑक्सफर्डच्या कोरोना लशीच्या (oxford corona vaccine) चाचणीवरील बंदी आता उठवण्यात आली आहे.
|
1/ 7
सर्व जगाचं लक्ष लागलेल्या Oxford कोरोना लशीची चाचणी पुन्हा सुरू होणार आहे. चार दिवसांतच कंपनीने पुन्हा ट्रायल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
2/ 7
ब्रिटनच्या Medicines Health Regulatory Authority (MHRA)ने पुन्हा परवानगी दिल्याचं सांगितलं आहे.
3/ 7
ब्रिटनमध्ये ट्रायल सुरू असताना ज्या व्यक्तीला ही लस दिली तिची प्रकृती बिघडली, त्यामुळे ब्रिटन आणि त्यानंतर भारतातही लशीची मानवी चाचणी तात्पुरती थांबवण्यात आली होती.
4/ 7
आज तकच्या रिपोर्टनुसार लस दिलेल्या यूकेतील महिलेच्या पाठीच्या मणक्यातील हाडाला गंभीर सूज आली आहे. असं खूप कमी पाहायला मिळतं. त्यामुळेच ट्रायल रोखल्याचं कंपनीनं सांगितलं होतं.
5/ 7
अॅस्ट्रॅजेनेका (AstraZeneca), ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी (Oxford university) ने तयार केलेली ही लस. ज्यामध्ये पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटचीही (serum institute) भागीदारी आहे.
6/ 7
बुधवारी अॅस्ट्रॅजेनेका तर गुरुवारी सीरमने इन्स्टीट्युटनेही या लशीचं ट्रायल थांबवण्याचा निर्णय घेतला होता.
7/ 7
त्यावर तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल दिला असून त्यात चाचण्या पुन्हा सुरू करण्यास हरकत नाही अशी शिफारस केली आहे.