हा चहावाला नेमकं वापरतो तरी काय? टपरीवर विकतोय 1000 रुपयाला एक कप चहा
10 च्या ऐवजी 1000 हे चुकून तर लिहिलं गेलं नाही ना? तर नाही खरंच इतक्या रुपयालाच टपरीवर चहा (TEA) मिळतोय. आता हा चहा नेमका कुठे मिळतो आहे आणि या चहामध्ये इतकं खास काय आहे, हे तुम्हाला बातमी वाचल्यानंतरच समजेल.
|
1/ 6
टपरीवरील एक कप चहा म्हणजे फक्त 10 रुपयांत मिळतो. त्यामुळे 1000 रुपये किंमत वाचूनच आश्चर्य वाटेल. एका हॉटेलच्या किमतीत टपरीवर चहा विकला जातो आहे. म्हणजे नक्कीच यात काहीतरी विशेष असणारच.
2/ 6
जपानची सिल्व्हर नीडल व्हाइट टी, आफ्रिकेतील कॅरेमेल, नायजेरियातील रेड वाइन टी आणि ऑस्ट्रेलियातील लेवेंडर अशा जगभरातील जवळपास 115 प्रकारच्या चहाची चव तुम्हाला इथं चाखायला मिळेल.
3/ 6
जर तुम्ही या चहासाठी वापरली जाणारी चहापत्ती विकत घ्यायला गेलात तर त्याची किंमत प्रतिकिलो लाखोत आहे. सिल्हर निडिल व्हाइट टीची किंमत 2 लाख 80 हजार रुपये प्रति किलो आहे. तर कॅमोमाइल टीची किंमत 14 हजार रुपये प्रति किलो आहे.
4/ 6
आता ही टपरी आहे तरी कुठे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ही टपरी आहे पश्चिम बंगालमध्ये.
5/ 6
पार्थप्रतिम गांगुली यांनी चहाच्या प्रेमापोटी आपली नोकरी सोडली आणि चहा विक्रेते बनले. त्यांनी हे चहाचं दुकान सुरू केलं.
6/ 6
1000 पैकी 100 लोक आपल्या टपरीवर चहा प्यायला येतात, असा दावा पार्थप्रतिम यांनी केला आहे. जे लोक एकदा इथला चहा प्यायलेत ते चहाचा आस्वाद पुन्हा घेण्यासाठी येतात असं त्यांनी सांगितलं. कित्येक लोक तर दररोज इथंच चहा पितात.