केंद्र सरकारने 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. शेती करणं सोपं व्हावं आणि त्यासाठी लागणारी खर्च कमी असावा यासाठी पाऊल उचलली जात आहे. शेती नांगरण्यासाठी शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करतात. सरकारचा दावा आहे की, जेव्हा शेतकरी साध्या ऐवजी सीएनजीच्या ट्रॅक्टरचा वापर करतील तर त्यांची वर्षाला 1.5 लाख रुपयांची बचत होईल.
12 फेब्रुवारी रोजी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी CNG ट्रॅक्टरचं उदघाटन केलं. त्यांनी ट्रॅक्टरचे अनेक फायदे सांगितले. सरकारने दावा केला आहे ती, सीएनजी ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांना बरीच मदत होईल. डिजेल ट्रॅक्टरच्या तुलनेत रेट्रोफिटेड सीएनजी ट्रॅक्टरचा वापर केला तर कमी खर्च येईल. आणि इंधनात बचत होईल.
डिजेल ट्रॅक्टरच्या तुलनेत सीएनजी ट्रॅक्टरची लाइफ जास्त असते. महत्त्वाची बाब म्हणजे सीएनजी ट्रॅक्टरला स्टार्ट करण्यासाठी डिजेलची आवश्यकता असते. म्हणजे ट्रॅक्टरमध्ये डिजेल इंधनही असेल. मात्र स्टार्ट झाल्यानंतर ट्रॅक्टरचा इंधनाचा स्त्रोत बदलून सीएनजीवर शिफ्ट होईल. ज्यामुळे शेतकरी आपल्या शेतीवरील खर्च कमी करू शकतील.