फ्री कसोल कॅफे, हिमाचल प्रदेश – हा कॅफे इज्रायली व्यक्तींमार्फत चालवला जातो. 2015 मध्ये या कॅफेने एका भारतीय महिलेला सर्व करण्यास नकतार दिला. कॅफेनं सांगितलं की ते फक्त आपल्या मेंबर्सना सर्व करतात. यानंतर या कॅफेवर टीका झाली, नक्षलवादाचा आरोपही लावण्यात आला. या कॅफेसंबंधित परिसरातील सर्व साइन बोर्डही हिब्रू भाषेत आहेत.
यूनो इन हॉटेल, बंगळुरू - या हॉटेलमध्ये फक्त जपानी लोकांना सेवा दिली जाते. 2012 साली स्थापन झालेल्या या हॉटेलवर नक्षलवादाचे गंभीर आरोप लागले होते आणि 2014 साली ग्रेटर बँगलोर सिटी कॉर्पोरेशनद्वारा हॉटेल बंद करण्यात आलं होतं. हॉटेल प्रशासनानं सांगितलं की, त्यांनी जपानच्या अनेक कंपन्यांसोबत करार केला आहे, त्यानुसार ते फक्त जपानी पर्यटकांना सेवा देतात.
नो इंडियन बीच, गोवा - गोव्याच्या बीचवर जगभरातील पर्यटक येतात. मात्र काही बीचवर भारतीयांना प्रवेश नाही. हा निषिद्ध प्रवेश कायद्याने नाही. मात्र इथल्या स्थानिकांनी सांगितल्यानुसार देशी पर्यटक परदेशी पर्यटकांसाठी समस्या ठरण्यासह त्यांच्याशी गैरव्यवहारही करू शकतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी बहुतेक बीचवर भारतीय पर्यटकांना प्रवेशाला मनाई केली आहे. अंजुना बीचवरही क्वचितच एखादा भारतीय पर्यटक दिसेल.