3000 वर्षं जुन्या असलेल्या ममीचा (Mummy) आवाज (Voice) ऐकण्याची किमया साधता आली. इजिप्तमध्ये (Egypt)सापडलेल्या सुमारे तीन हजार वर्षं जुन्या असलेल्या ममीचा आवाज तयार करण्यात शास्त्रज्ञांना जानेवारीत यश आलं. हा आवाज प्राचीन काळी जेव्हा ती व्यक्ती जिवंत असेल, तेव्हाच्या त्या व्यक्तीच्या आवाजाप्रमाणे असेल, असा अंदाज आहे.
सूर्याचे आतापर्यंतच्या तुलनेत सर्वांत जवळून फोटो काढण्यात शास्त्रज्ञांनी यश मिळवलं. सूर्याच्या अंतर्गत भागातली खदखद म्हणजे बॉयलिंग प्लाझ्मा (Boiling Plasma) या फोटोत स्पष्ट दिसला. प्रत्यक्षात तो आकार टेक्सास (Texas) शहराएवढा मोठा आहे. त्यातून उष्णता सूर्याच्या पृष्ठभागावर आणण्याचं कार्य सतत सुरू असतं.
या वर्षी अंतराळातही अनेक वेगळ्या गोष्टी घडल्या. एप्रिलमध्ये आपल्या पृथ्वीच्या जवळ एक धूमकेतू आला. त्याला Comet 2I/Borisov असं नाव देण्यात आलं. नासाच्या शास्त्रज्ञांनी त्याला स्नोमॅन असंही संबोधलं. हा धूमकेतू पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळी तुटून तयार झाला होता किंवा काही बदलांतून गेला असावा, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.