तुमची नखं अशी तर नाहीत ना? नखांमधील बदल देत आहेत गंभीर आजारांचे संकेत
नखांमध्ये होणारे बदल हे एखाद्या आजाराचं लक्षण असू शकतं. नखं तुम्हाला तुमच्या आरोग्याचे संकेत देत असतात.
|
1/ 7
पांढरी नखं - नखांचा रंग खूपच पांढरा असेल, तर तुम्हाला हेपेटायटिससारखी लिव्हरची समस्या असू शकेल. (pic credit - pxhere.com)
2/ 7
नखं फिकट होणं - नखांचा रंग फिका पडला असेल तर अनिमिया, लिव्हर डिसीज, कुपोषण अशी समस्या असू शकते. (pic credit - wikimedia.org)
3/ 7
नखांचा रंग पिवळा होणं - नखं पिवळी पडण्यामागे मुख्य कारण म्हणजे फंगल इन्फेक्शन. तसंच काही दुर्मिळ प्रकरणात हे थायरॉईड, फुफ्फुसच्या गंभीर आजाराचं किंवा मधुमेह, सोरायसिस यांचं लक्षण असू शकतं. (pic credit - pxhere.com)
4/ 7
खडबडीत नखं - नखांचा पृष्ठभाग खडबडीत असेल तर हे सोरायसिस किंवा इन्फ्लेमेटरी आर्थरायटिसचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. (pic credit - pxfuel.com)
5/ 7
तुटलेली नखं - नखं कोरडी पडली की ती तुटतात, मात्र जर नखं विचित्ररित्या तुटत असतील तर थायरॉईडचा आजार असू शकतो. नखं पिवळसर होऊन तुटत असतील, तर असं फंगल इन्फेक्शन झाल्यास होतं. (pic credit - wikimedia.org)
6/ 7
नखांखाली काळ्या रेषा - नखांच्या आतून तुम्हाला काळ्या रेषा दिसत असतील, तर काही वेळा हे मेलानोमा या त्वचेच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. त्यामुळे अशा रेषा दिसल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखवा (pic credit - libreshot.com)
7/ 7
सूचना - या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची पुष्टी देत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. (pic credit - piqsels.com)