

सोशल मीडियावर सुंदर, आकर्षक, हॉट फोटोंची चर्चा असतेच. असे फोटो असणाऱ्या अकाऊंटचे कित्येक फॉलोअर्स असतात, कित्येक लाइक्स मिळतात. मात्र एका मॉडेलनं दावा केला आहे की ती सुंदर दिसते म्हणून तिला डेटिंग अॅपनं बॅन केलं आहे. (फोटो सौजन्य - luna.benna/इन्स्टाग्राम)


21 वर्षाची मॉडेल लूना बेनाला डेटिंग अॅप टिंडरने बॅन केलं आहे आणि याचं कारण म्हणजे ती खूप सुंदर दिसते. आपण सुंदर दिसत असल्यानं टिंडर आपल्याला वारंवार बॅन करत असल्याचा दावा लूनानं केला आहे. (फोटो सौजन्य - luna.benna/इन्स्टाग्राम)


आज तकच्या रिपोर्टनुसार लूनानं सांगितलं, 2017 सालापासून ती टिंडरवर आहे. मात्र अॅपवर येताच काही कालावधीत लोक तिचे फोटो चोरू लागले आणि फेक अकाऊंट्स बनवू लागले. फक्त टिंडरच नाही तर फेसबुकवरही आपले फेक अकाऊंट तयार करण्यात आले ज्यावर हजारो फॉलोअर्स आहेत. (फोटो सौजन्य - luna.benna/इन्स्टाग्राम)


सुंदर दिसत असल्याने टिंडरवर आपल्याला धमक्यादेखील देण्यात आल्यात आणि जेव्हा जेव्हा या फेक प्रोफाइलला तिनं मेसेज करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला ब्लॉक केलं जायचं. लोक माझ्या फोटोचा वापर करून फेक प्रोफाइल बनवतात आणि त्यामार्फत कमाई करतात, हे चुकीचं आहे, असं लूना म्हणाली. (फोटो सौजन्य - luna.benna/इन्स्टाग्राम)


आज तकच्या रिपोर्टनुसार लूनाचे इतके फेक अकाऊंट्स आहेत की टिंडरलाही यातील लूनाचं खरं अकाऊंट कोणतं आणि खोटं कोणतं ते समजत नव्हतं. त्यामुळेच जेव्हा लूना या अॅपवर ओरिजनल अकाऊंट बनवण्याचा प्रयत्न करते तेव्हा टिंडर त्याला फेक प्रोफाइल समजून ब्लॉक करतं. (फोटो सौजन्य - luna.benna/इन्स्टाग्राम)