PNB Scam: कुबेरालाही लाजवेल अशी श्रीमंती, आलिशान बंगले, लक्झरी कार असं होतं मेहुल चोक्सीचं आयुष्य
PNB घोटाळ्याचा आरोपी आणि फरार असलेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला अखेर इंटरपोलने नोटिस दिल्यानंतर डोमिनिका इथून अटक करण्यात आली आहे. चोक्सीचं आयुष्य कल्पनातीत विलासी कसं होतं पाहा फोटो...
|
1/ 6
मेहुल चोक्सी हा एक मोठा हिरा व्यापारी म्हणून जगभरात ओळखला जातो.
2/ 6
मेहुलचा हिऱ्याचा व्यवसाय बर्याच देशात पसरला आहे. गीतांजली ज्वेलर्स या त्याच्या ब्रँडसाठी ऐश्वर्य़ा राय, कतरिना कैफपासून अनेक सेलेब्रिटींनी काम केलं होतं.
3/ 6
मेहुलची उंची पाच फूट पाच इंच असून वजन सुमारे 120 किलो आहे. गुजरातच्या पालनपूरला जन्म झाला. शिक्षण पुरं न करताच वडिलांच्या व्यवसायात सामील झाला.
4/ 6
आपला भाचा नीरव मोदीला पंजाब नॅशनल बँकेत घोटाळा करण्याचा रस्ता त्यानेच दाखवला. मेहुल देवाधर्मावर विश्वास ठेवणारा होता. त्याच्या हाती कायम गंडेदोरे असतात.
5/ 6
. PNB फसवणुकीप्रकरणी त्यांची पत्नी अॅमी मोदीविरूद्ध FIR दाखल करण्यात आली होती.
6/ 6
मेहुलची एकूण मालमत्ता सुमारे 12,500 कोटी रुपये आहे. मेहुल वर बनावटी हिरे विकण्याचा आरोप आहे.