कोरोना व्हायरसवर अद्यापही लस किंवा औषध आलेलं नाही. भारतासह अनेक देशात लशीवर काम सुरू आहे. अशात मास्क लावणं आणि फिजिकल डिस्टेंन्सिंग पाळणं हे बचावतंत्र ठरतं आहे. मास्क लावण्यामुळे कोरोना व्हायरसचा धोका कमी होतो. परंतु आता थंडीच्या दिवसात मास्क घालण्यामुळे अनेक प्रकारच्या एलर्जी होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. (सांकेतिक फोटो - Pixabay)
संशोधकांना असं आढळलं आहे की, कोरोनापासून बचावासाठी असेलल्या मास्कमध्ये अनेक प्रकारचे एलर्जी निर्माण करणारे तत्व असतात, ज्यामुळे त्वचेचं संक्रमण होऊ शकतं. ज्यांना आधीपासूनच त्वचेची-स्किनची समस्या आहे, त्यांना मास्कमुळे आणखी त्रास होऊ शकतो. अमेरिकन कॉलेज ऑफ एलर्जी, अस्थमा आणि इम्युनोलॉजीच्या (ACAAI) एका व्हर्च्युअल मीटिंगमध्ये डॉक्टरांनी याप्रकारच्या समस्यांवर चर्चा केली. (सांकेतिक फोटो - Pixabay)
त्वचारोग तज्ज्ञांचा सांगितलं की, त्वतेच्या समस्या आणि विशेषत: चेहेऱ्यावर होणाऱ्या समस्यांमध्ये यावर्षी मोठी वाढ झाली आहे. मास्कवरील एलर्जेन हे यामागचं मोठं कारण ठरत आहे. मास्कच्या इलास्टिकमुळेही त्वचेच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळेच डॉक्टर इलास्टिक किंवा रबर नसलेलं मास्क वापरण्याचा सल्ला देतात. त्याशिवाय सिंथेटिक मास्कऐवजी सुती कपड्याचे, कोणत्याही डायचा वापर केला नसलेल्या मास्कमुळे एलर्जीपासून बचाव केला जाऊ शकतो. (सांकेतिक फोटो - Pixabay)
यापूर्वीही मास्कमुळे एलर्जी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यूनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनमध्ये झालेल्या अभ्यासात असं आढळून आलं की, अनेकांना लेटेक्सची (latex) एलर्जी होते. लेटेक्सपासून बनलेले मास्क घातल्यास अनेकांना लगेचच समस्या येतात. इलास्टिक बनवण्यासाठी लेटेक्सचा वापर केला जातो. त्यामुळेच अतिशय संवेदनशील-सेन्सिटिव्ह त्वचेच्या लोकांना इलास्टिकवालं मास्क न घालण्याचा सल्ला दिला जातो. (सांकेतिक फोटो - Pixabay)
मास्कची एलर्जी आहे की नाही ते ओळखणं सोपं आहे. मास्क घातल्यानंतर 10 ते 15 मिनिटांत जर चेहऱ्यावर जळजळ किंवा खाज आल्यास, तुम्हाला त्या मास्कच्या मटेरियलची एलर्जी असल्याचं किंवा तुमची त्वचा त्या मटेरियलसाठी सेन्सिटिव्ह असल्याचं समजावं. असं झाल्यास सुती कापडाचं मास्क वापरावं. (सांकेतिक फोटो - Pixabay)
अनेकदा अस्थमा रुग्णांना फेस मास्कमुळे त्रास होतो. याबाबत बोलताना Asthma and Allergy Foundation of America चे (AAFA) सदस्य डॉ. डेव्हिड स्टकस यांनी सांगितलं की, अस्थमाची हलकी समस्या असल्यास त्रास कमी होईल, परंतु गंभीर लक्षण असणाऱ्यांसाठी ही मोठी समस्या ठरू शकते. त्यामुळे अशा रुग्णांनी गरज असल्यासच बाहेर पडावं, बाहेर पडल्यास असल्यास, मास्क न घालता अशा रुग्णांनी बाहेर पडू नये. (सांकेतिक फोटो - Pixabay)