

खड्ड्यांनी कित्येकांचा जीव घेतला आहे. अशाच मुंबईतील खड्ड्याने एका मुलाला त्याच्या बापापासून हिरावलं त्यानंतर वडिलांनी खड्डे बुजवण्याचा वसाच हाती घेतला आणि आता यूकेमध्ये खड्ड्यांना वैतागलेल्या एका बापानं चक्क आपल्या मुलालाच खड्ड्यात गाडलं आहे. (फोटो सौजन्य - एरॉन क्रॉस)


डेली मेलच्या रिपोर्टनुसार यूकेतील लंकाशायरच्या वायकॉलर क्षेत्रात राहणारे 52 वर्षांचे एरॉन क्रॉस व्यक्तीच्या घराजवळ एक खड्डा आहे. ज्याच्याजवळ कोणतंच साइन बोर्ड नाही. त्यांनी वर्षभरापूर्वीच लंकाशायर काऊंटी काऊन्सिलच्या हायवे टीमला याची माहिती दिली होती. (फोटो सौजन्य - एरॉन क्रॉस)


प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही त्याकडे लक्ष देण्यात आलं नाही. खड्डा बुजवण्यासाठी काहीच हालचाल झाली नाही. घराजवळील खड्डा आणि प्रशासनाचा त्याकडे कानाडोळा यामुळे एरॉन वैतागले होते. त्यांनी रागात या खड्ड्यात आपल्या मुलालाच गाडलं. (फोटो सौजन्य - एरॉन क्रॉस)


एरॉन यांचा मुलगा 27 वर्षांचा आहे. ज्याची उंची सहा फूट आहे. तो पूर्णपणे या खड्ड्यात मावला त्याचा फक्त मानेपासूनचा वरील भाग खड्ड्याच्या बाहेर राहिला. खड्डा किती खोल आहे याचा पुरावा प्रशासनाला देण्यासाठी एरॉन यांनी असा विचित्र निर्णय घेतला. (फोटो सौजन्य - एरॉन क्रॉस)


क्रॉसनं सांगितलं, माझा मुलगा सहा फूट उंच आहे, तो या खड्ड्यात पूर्णपणे मावला. त्यावरूनच हा खड्डा किती धोकादायक आहे हे समजून येतं एखाद्या अपंग व्यक्तीला हा खड्डा दिसणं शक्यच नाही आणि लहान मूलही त्यात पडून त्याचा जीव जाऊ शकतो. मात्र तरी यावर काहीच पावलं उचलली नाही जात आहेत. आता यावर कायदेशीर कारवाईचा विचार करत आहे. (फोटो सौजन्य - एरॉन क्रॉस)


लंकाशायर काऊंटी काऊन्सिलच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा या जागेची तपासणी करण्यात आली तेव्हा तिथं कोणताच मोठा खड्डा नव्हता. आम्ही क्रॉस यांनी काढलेला हा खड्ड्याचा फोटो नेमका कुठचा आहे, याची माहिती घेऊ. जेणेकरून आम्ही याची तपासणी करून गरज पडल्यास कारवाई करू. (फोटो सौजन्य - एरॉन क्रॉस)