अभिनेत्री करीना कपूर आणि मलायका अरोरा दोघीही सध्या हिमाचल प्रदेशमध्ये आहेत. करीना सैफ अली खानसह आणि मलायका अर्जुन कपूरसह तिथं दिवाळी सेलिब्रेशन आणि सहलीसाठी गेली आहे. मात्र सैफ-अर्जुन दोघंही भूत पोलीस फिल्मच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे करीना आणि मलायका दोघंही एका खास व्यक्तीसोबत एन्जॉय करत आहेत.
ही खास व्यक्ती आहे ती म्हणजे छोटा नवाब तैमूर अली खान. मलायकाने करीना आणि तैमूरसोबत एक फोटो शेअर केला आहे. करीनानं ब्लॅक ट्रॅक सूट आणि सन शेड्स घातलेला आहे. तर तैमूर राखाडी स्वेटरमध्ये खूपच छान दिसत आहे. मलायकाने घातलेल्या त्या कोटमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. आई करीनाच्या मांडीवर बसलेल्या तैमूरकडे पाहून ती स्मितहास्य करताना दिसत आहे.