

किंगफिशर कॅलेंडर आपल्या नव्या एडिशनसाठी तयार झालं आहे. निसर्गरम्य ठिकाणं आणि अप्रतिम मॉडेल्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या या कॅलेंडरचं शूट या वेळी भारताच्या दक्षिणेतल्या देवभूमी केरळमध्ये करण्यात आलं.


हे शूट कोचीतील नितळ पाणी असणाऱ्या मरारी बीच आणि खाऱ्या पाण्याच्या तळ्यांशेजारी असलेल्या हिरव्यागार नारळाच्या बागांमध्ये करण्यात आलं आहे.(Image: Special Arrangement)


हा अप्रतिम चित्र प्रवास व्हिक्टोरियन-स्टाईलच्या ब्रँटन बोटयर्डपासून तुम्हाला चित्तूर पॅलेस या हेरिटेज रिसॉर्टचं दर्शन घडवणार आहे.(Image: Special Arrangement)


जंगल, हिरवेगार डोंगरांपासून ते शांत, स्थिर बॅकवॉटर्स अशा मनमोहक दृश्यांनी सजलेलं किंगफिशर कॅलेंडर 2021 हे चाहत्यांना आकर्षित करेल. (Image: Special Arrangement)


किंगफिशर कॅलेंडर 2021 च्या 19 व्या एडिशनमध्ये या 5 मोहक मॉडेल्स दिसतील - गहना महिआर्या, कृतिका बाबू, अनुक्रिती वास, अडलिन कॅस्टेलिनो आणि सुमिता भंडारी. या वर्षी आलिया अल रुफाईने या मॉडेल्सचं स्टायलिंग केलं आहे. मनीषा फिअलकिना यांनी त्यांचं मेकअप केलं आहे, तर फ्लॅव्हिन हेल्डट यांनी हेयर स्टायलिंग केलं आहे. किंगफिशर कॅलेंडरशी सुरुवातीपासून जोडलेले जगविख्यात फॅशन फोटोग्राफर अतुल कसबेकर यांनी या सौंदर्यवतींचे मनमोहक फोटो क्लिक केले आहेत. Image: Special Arrangement)


हे वैभवशाली राज्य खरोखरच एक देवभूमी आहे आणि इथं आमच्या आवडीनुसार उत्तम शूटिंग लोकेशन्सचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. महासागरापासून ते बॅकवॉटर्स आणि अनेक तलाव या राज्यांत मोठ्या प्रमाणात आहेत. फोटोग्राफरसाठी जणू ही पर्वणीच आहे(Image: Special Arrangement)


हेअर स्टाईलिस्ट फ्लॅव्हिन हेल्डट आणि मेकअप आर्टिस्ट मनिषा फिअलकिना यांच्यासोबत मॉडेल अनुक्रिती वास. (Image: Special Arrangement)