

ग्लोबल पीस इंडेक्स 2019 ने जगभरातील धोकादायक देशांची यादी जारी केली आहे. या देशांतील सुरक्षा आणि स्थिती यांच्यावरून हे देश किती धोकादायक आहेत त्याचं मोजमाप केलं गेलं आहे. जाणून घेऊ अशा देशांबद्दल जिथे माणसांचा जीव हा बंदुकीपेक्षा अधिक स्वस्त आहे.


दहाव्या स्थानावर जो देश आहे त्याबद्दल जाणून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. दहाव्या स्थानावर रशिया हा देश आहे. हा देश सुरक्षा, अंतर्गत संघर्ष आणि राजकीय दहशतवाद अशा प्रश्नांशी लढत आहे.


नवव्या स्थानावर रिपब्लिक ऑफ कांगो हा देश येतो. लँडमाइन, पूर आणि नैसर्गिक आपत्ती यांमुळे हा देश नेहमीच त्रस्त असतो.


या यादीत आठव्या स्थानावर आहे तो लीबिया देश. सतत वाढणारे अपराध, गृहयुद्ध यांमुळे हा देश राहण्यास धोक्याचा झाला आहे.


सर्वात धोकादायक देशांच्या यादीत सातव्या स्थानावर सेंट्रल आफ्रीकन रिपब्लिक हा देशही सामील आहे. हा देश राजकीय, गृहयुद्ध आणि आरोग्याशी निगडीत समस्यांमुळे रहाण्यास कठीण आहे.


सहाव्या स्थानावर सोमालिया देशाचं नाव आहे. तिथे दहशतवाद आणि सैन्य संघर्षामुळे तिथे राहणं हे अत्यंत धोकादायक आहे.


सर्वात धोकादाय देशांमध्ये इराकचं स्थान पाचवं आहे. इथे दहशतवाद आणि सैन्य संघर्ष हा ऐरणीचा मुद्दा आहे.


तिसऱ्या स्थानावर दक्षिण सुडान हा देश आहे. या देशात राजकीय आणि जातीय संघर्षामुळे फार नुकसान झालं आहे. याशिवाय या देशात फार भ्रष्टाचारही आहे.


रिपोर्टनुसार राहण्यास सर्वात धोकादायक देश हा सीरिया आहे. गृहयुद्ध, आयसीस आणि सतत वाढणारे अपराधामुळे इथल्या नागरिकांचे हाल होत आहेत.