

1 - दीवपासून ते सोमनाथपर्यंत सायकलिंग करण्याची एक वेगळीच मज्जा आहे. विस्तिर्ण असा समुद्र किनारा आणि त्याबाजची सरूची आणि माडीची झाडं तुमचं मन मोहून घेतील. या मार्गावर अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे तुम्हाला थांबून फिरता येईल.


2 - तवांग ते बोडमिलापर्यंतचा प्रवास सायकरने करण्याची एक वेगळीच अनुभूती आहे. परवत रांगांमळे उंच आणि सखल तसंच वळणदार मार्गावर सायकल चालवताना अनेक आव्हानांना तुम्हाला तोंड द्यावं लागेल. या मार्गावर सायकलिंग करताना प्रचंड कस लागतो.


3 - बंगळुरूपासून नंदी हिलपर्यंत सायकलिंग करण्याची एक वेगळीच उर्मी आहे. आता पावसाळा सुरू होत आहे. अशात या मार्गावर सायकलिंग करणं धोक्याच असल्यामुळे जरा सांभाळूनच. इतर मोसमात तुम्ही या मार्गाने सायकलिंगचा अनुभव लुटू शकता.


4 - सिक्कीमधलं जुलूक ते कलिमपोंग या मार्गावर तुम्हाला सायकलिंगचा थरार अनुभव अनुभवता येईल. बर्फवृष्टी सुरू होताच हा मार्ग धोकादायक बनतो. त्यामुळे समुद्रसपाटीपासून 3078 मीटर उंचावर असलेल्या या मार्गावर जर तुम्हाला सायकल चालवण्याचा आनंद लुटायचा असेल तर आधी तुम्हाला बर्फवृष्टीचा अंदाज घ्यावा लागेल.