

पावसाळ्यात पुणे जिल्ह्यातल्या माळशेज घाटाचं सौदर्य अगदी पाहण्यासारखं असतं. मुंबईपासून 150 किमी अंतरावर असलेल्या या वळणदार घाटात दरवर्षी पावसाळ्यात पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात.


पुणे-मुंबई दरम्यान असलेल्या लोणावळा आणि खंडाळा घाटातलं निसर्ग सौदर्य न्याहाळण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक येतात. हिरव्यागार डोंगर रांगा, त्यातून वाहणारे धबधबे, डोंगरमाथ्यावर जमा होणारी धुक्याची चादर हा निसर्गाचा नजराणा लोणावळा आणि खंडाळ्यात पाहायला मिळतो. या भागात इतिहासाची सक्ष देणारे गड-किल्लेसुद्धा असल्याने इथला परिसर पर्टकांना नेहमी खुणावतो.


भडारदरा इथला 'काजवा महोत्सव' हा पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतो. निसर्गरम्य वातावरण अनुभवायचं असेल पर्यटकांनी पावसाळ्यात भंडारदऱ्याला भेट द्यालाच हवी.


महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून साताऱा जिल्ह्यातील महाबळेश्वरची ओळख आहे. येणाऱ्या पर्यटकांना इथला वेण्णा तलाव नेहमीच खुणावत असतो. पावसाळ्यात या तलावात बोटींग करण्याचा सुखद अनुभव येथे घेता येतो. कोयना, कृष्णा, वेण्णा, गोवित्री आणि सावित्री या पाच नद्यांचा उगम याच भागात आहे.