थायलंडच्या राजाच्या गर्लफ्रेंडचे Nude Photo लीक, राणीवर झाला आरोप
थायलंडचा राजा महा वजिरालॉंगकोर्नची (Maha Vajiralongkorn) प्रेयसी (Girlfriend) सीनीनतचे (Sineenat Wongvajirapakdi) 1000 हून अधिक नग्न फोटो लीक झाले आहेत. यामागे थायलंडच्या राजाची पत्नी (Queen) सुथिडाचा (Suthida) हात असल्याचं म्हटलं जात आहे.


थायलंडच्या राजाची गर्लफ्रेंड आणि त्यांची पत्नी यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. थायलंडचा राजा महा वजिरालॉंगकोर्नची प्रेयसी सीनीनत वोंगवाजीरापाकडीचे 1000 हून अधिक नग्न फोटो लीक झाले आहेत. विविध बातम्यांनुसार फोटो लीक होण्यामागे थायलंडच्या राजाची पत्नी सुथिडा हिचा हात असल्याचं म्हटलं जात आहे. त्यांची पत्नी आणि प्रेयसीच्या अंतर्गत कलहामुळे हे घडलं असल्याचं बोललं जात आहे.


गेल्या वर्षी राजाची गर्लफ्रेंड सीनीनत वोंगवाजीरापाकडी थायलंडच्या तुरुंगात कैद होती. अलिकडेच तिची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर ती पुन्हा राजाच्या जवळ येऊ लागली होती. यादरम्यान तिची हजारो नग्न छायाचित्रं लिक झाली आहेत. (फोटो सौजन्य- न्यूज18 गुजराती)


डेली मेलच्या बातमीनुसार, हे सर्व फोटो 2012 ते 2014 च्या दरम्यान काढले गेले होते. असं सांगितलं जात आहे की, सीनीनतनं स्वत: हे फोटो काढले होते. थायलंडचा राजा सध्या 68 वर्षांचा आहे. त्याला तीन राण्यांची मिळून एकूण 7 मुलं आहेत. पहिल्या 3 बायकांचा आणि राजाचा घटस्फोट झाला आहे. सुथिडा चौथी बायको आहे. (फोटो सौजन्य- न्यूज 18 गुजराती)


राजाची गर्लफ्रेंड सीनीनत आणि पत्नी सुथिंडा या दोघींनीही राजाच्या दरबारात वरिष्ठ अधिकारी म्हणून काम केलं आहे. त्याचबरोबर सुथिडाने सुरुवातीला काही काळ थाई एअरवेजमध्ये फ्लाइट क्रू म्हणूनही काम केलं आहे. तर सीनीनत ही एक आर्मी परिचारिका आहे. राजाची प्रियसीला 2019 साली राणीच्या प्रतिमेला कलंक लावण्याच्या आरोपाखाली तुरूंगात टाकण्यात आलं होतं. (फोटो सौजन्य- न्यूज 18 गुजराती)