अमिताभ, शाहरुखलाही नाही मिळत अशी Security; कंगना रणौतला थेट CRPF कडून स्पेशल संरक्षण
कंगना रणौत (kangana ranaut) Y PLUS SECURITY मिळणारी पहिली बॉलिवूड स्टार आहे.
|
1/ 8
अभिनेत्री कंगना रणौत मुंबईत येणार आहे. तिच्याविरोधातील रोष पाहता तिला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
2/ 8
Y दर्जाची सुरक्षेत एकूण 11 सुरक्षा कर्मचारी तैनात असतात. यात दोन कमांडो तैनात असतात. ही सुरक्षा 24x7 असते. आता ही सुरक्षा व्यवस्था थेट सीआरपीएफ सांभाळू शकते.
3/ 8
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, CRPF जवानांकडून सुरक्षा मिळणारी कंगना रणौत ही पहिली आणि एकमेव बॉलिवूड स्टार आहे.
4/ 8
बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांनाही आतापर्यंत पोलीस दलाकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. याशिवाय त्यांचा स्वत:चा सुरक्षारक्षकही असतो.
5/ 8
दबंग सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा तर सर्वांना माहितीच आहे. सलमान खानला सुरक्षा देण्याशिवाय शेराची स्वत:ची सिक्युरिटी फर्मदेखील आहे. जेव्हा सलमान एखाद्या कार्यक्रमाला जातो तेव्हा त्याच्यासग खूप बॉडीगार्ड असतात.
6/ 8
बॉलिवूडचा किंग शाहरूख खानला मुंबई पोलिसांकडून सुरक्षा दिली जाते. साध्या वेशात पोलीस अधिकारी त्याच्यासह असतात. याशिवाय त्याचा स्वत:चा बॉडीगार्ड असतो.
7/ 8
आमिर खानसह तर त्याचे स्वत:चे सहा ते सात बॉडीगार्ड असतात. जीममध्येदेखील एक बॉडीगार्ड त्याच्यासह असतो.
8/ 8
सुपरस्टार रजनीकांतलादेखील पोलीस संरक्षण देण्यात आलं होतं. मात्र त्याने आपल्याला पोलीस संरक्षण नको म्हटलं आणि आपलं पोलीस संरक्षण काढून घेण्याची विनंती केली होती.