पिवळ्याधमक हळदीने न्हालेली जेजुरी सोन्याची जेजुरी म्हणून ओळखली जाते. आता हीच सोन्याची जेजुरी पांढऱ्याशुभ्र फुलांनी नटली आहे. जेजुरीच्या खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास करण्यात आली आहे. वैशाख मासानिमित्त वसंत ऋतूमध्ये मोगरा महोत्सव आणि चंदन उटी महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. रात्री 9 वाजता ही पूजा करण्यात आली. पुणे येथील खंडोबा भक्त श्री सुनील बबनराव पडवळ यांनी या मोगऱ्याच्या माळा दिल्या. तर पुजारी गणेश आगलावे यांनी ही सजावट केली आहे. या पांढऱ्याशुभ्र आणि सुवासिक मोगऱ्यांनी जेजुरीचं सौंदर्य अधिकच वाढलं.