तुमची मुलंही नखं चावतात का? अशी सोडवा त्यांची ही सवय
बहुतेक लहान मुलांना नखं चावण्याची सवय असते. मात्र वेळीच ही सवय सोडवली नाही तर मोठेपणीही कायम राहिलं.
|
1/ 6
लहान मुलंच नव्हे तर मोठ्या माणसांनाही नखं चावण्याची सवय असते. अनेकदा आपल्या लहानपणीच्या सवयी मोठेपणीही कायम राहतात. त्यामुळे लहानपणी नखं चावण्याची सवय असेल तर त्याला वेळीच आवर घालायला हवा.
2/ 6
नखांमध्ये घाण साचते, अशावेळी नखं चावल्याने ही घाण पोटात जाऊन मुलांना विविध आजार उद्भवू शकतात. मुलं जेव्हा नखं चावतात तेव्हा ते तोंडामध्ये लागण्याचीही शक्यता असते.
3/ 6
त्यामुळे शक्यतो लहान मुलांची नखं वाढूच देऊ नका, पालकांनी ती सतत कापावीत.
4/ 6
मुलांच्या बोटांवर एखादा कडू पदार्थ लावा जेणेकरून नखं चावण्यासाठी जेव्हा ते बोट तोंडात घालतील तेव्हा त्यांना कडू लागेल आणि ते पुन्हा बोट तोंडात घालणार नाहीत.
5/ 6
मुलं रिकामी बसलेली असतील तेव्हा शक्यतो नखं चावायला सुरुवात करतात, अशावेळी त्यांना ड्रॉइंग करायला द्या किंवा एखद्या खेळात गुंतवणा जेणेकरून त्यांचे हात व्यस्त राहतील आणि नखांवरील लक्ष हटेल.
6/ 6
मुलं नखं चावत असल्याचं दिसली की त्यांना एखादं फळ खायला द्या. या सर्वात चांगला पर्याय आहे.