भारतात सुरू झालं पहिल-वहिलं Toy Fair: अमेरिकेत 1903 मध्ये झाली होती सुरुवात
भारतात 27 फेब्रुवारी 2021 ला याची सुरुवात झाली असली, तरी अमेरिकेत 1903 पासून हे प्रदर्शन सुरू आहे. कोरोनाच्या साथीमुळे भारतातल्या पहिल्या प्रदर्शनाचं व्हर्च्युअल पद्धतीनेच उद्घाटन केलं.
भारतात 27 फेब्रुवारी 2021 ला पहिलं टॉय फेअर सुरू झालं आहे. अमेरिकेत 1903 पासून हे प्रदर्शन सुरू आहे
2/ 9
टॉय फेयर म्हणजेच एक प्रकारची खेळण्यांची जत्राच म्हणावी लागेल. यामध्ये एक मुलगा पोर्टेबल DVR वर कार्टून बघताना दिसत आहे.
3/ 9
या अमेरिकन खेळण्यांच्या प्रदर्शनात विजेवरील तसेच यांत्रिक खेळणी मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आली आहेत.
4/ 9
या फोटोत एक स्केटबोर्ड सुद्धा ठेवण्यात आलेला आहे. त्यामध्ये विविध रंगाचे रंगीबेरंगी बल्ब लावलेले दिसत आहे.
5/ 9
या वर्षी भारतातलं प्रदर्शन कोरोनाच्या भीतीमुळे व्हर्च्युअल स्वरूपात असलं, तरी अमेरिकेत असे अतरंगी प्रकारही प्रत्यक्ष प्रदर्शनात पाहायला मिळाले आहेत.
6/ 9
यामध्ये लॉरेन विद्युत रोषणाई दाखवणाऱ्या खेळण्यांच प्रदर्शन करत आहे. ही विद्युत खेळणी असून सुद्धा मुलांसाठी अतिशय सुरक्षित असल्याचं म्हंटल जात आहे.
7/ 9
न्यूयॉर्कच्या प्रदर्शनात एक प्रकारची मेटल खेळणी आहेत. न्यूबॉइस, लेफ्ट, यीप्पिटस अशी यांची नावं असून ही खेळणी चक्क बोलू शकतात, नृत्य करू शकतात इतकंच नव्हे तर हसूही शकतात.
8/ 9
सर्वांचा लाडका मिकी सुद्धा यात आहे. एका व्यक्तीला पाश्चात्य पद्धतीचं नृत्य शिकवताना दिसत आहे.
9/ 9
या फोटोमध्ये एक खूपच सुंदर मेटल स्कूटर गर्ल दाखवण्यात आली आहे.