माहिती मिळवल्यानंतर समजलं की हा दगड साधासुधा नाही तर आकाशातून कोसळलेली एक दुर्मिळ उल्कापिंड आहे. ही उल्कापिंड जवळपास 4.5 वर्षे जुनी असल्याचं सांगितलं जातं आहे. जोसुआनं सांगितलं, जेव्हा मी छताकडे पाहिलं तेव्हा ते तुटलं होतं. त्यामुळे आकाशातूनच हा दगड जमिनीवर आला अशी शक्यता मला वाटली. कारण माझ्या छतावर असं दगड कुणी फेकणं अशक्यच आहे. (फोटो- Social Media)
ही उल्कापिंड खूप अनमोल आहे. याची किंमत प्रतिग्रॅम 857 डॉलर आहे. रिपोर्टनुसार जोसुआनं खड्डा खणून ही अनमोल उल्कापिंड बाहेर काढला, ज्यामुळे तिच्यावर त्याचा मालकी हक्क होता. या अनमोल दगडाच्या बदल्यात जोसुआला 14 लाख पाउंड म्हणजे तब्बल 10 कोटी रुपये मिळाले. इतके वर्षे काम करून त्याला पगार मिळाला नाही, तितका पैसा आपल्याला या दगडामुळे मिळाला, असं जोसुआनं सांगितलं. जोसुआला तीन मुलंही आहे. या पैशातून तो आपल्या समुदायासाठी चर्च उभारणार आहे. (फोटो- Social Media)