भारतातल्या 'या' रेल्वे स्टेशन्सवरील खाणं सर्वात बेस्ट, आयुष्यात एकदा तरी करा टेस्ट
तुम्ही भारतातील (India) एखाद्या ठिकाणी ट्रिपवर (Trip) जाण्याचं ठरवत आहात आणि रेल्वेने प्रवास करणार असाल, तर या रेल्वे स्टेशन्सवरील (Railway station food) पदार्थांची चव जरूर चाखा
|
1/ 7
जालंधर स्टेशनचे छोले भटुरे - पंजाबच्या जालंधर स्टेशनहून जाणार असाल तर तिथले छोले भटुरे जरूर खा. एकदा का तुम्ही इथल्या छोले भटुरेची चव चाखाल, तर इतर ठिकाणच्या छोले भटुरे तुम्हाला बेचव लागतील, या छोले भटुरेची चव तुम्ही कधीच विसरणार नाही.
2/ 7
खडहूर रेल्वे स्टेशनचे दम आलू - बंगालच्या खडगूर रेल्वे स्टेशनवर पोहोचताच एक सुगंध तुम्हाला आकर्षित करेलआणि हा मसालेदार सुगंध दम आलूचा असेल. हा सुगंध येताच, तुम्ही लगेचच दम खालू खायला जा. याची चव चाखताच तुम्हाला पुन्हा पुन्हा खावंसं वाटेल.
3/ 7
एर्नाकुलम रेल्वे स्टेशनचे पकोडे - दक्षिण भारतात गेलात तर एर्नाकुलम जंक्शन स्टेशनवरील पकोडे जरूर खा. कच्ची केळी, डाळ आणि मैदा वापरून हे पकोडे तयार केले जातात. याशिवाय चटणी आणि चहासोबत या पकोड्यांचा आस्वाद घ्या.
4/ 7
रतलाम रेल्वे स्टेशनचे पोहे - या स्टेशनवरील पोहे खाल, तर त्याची चव कधीच विसरणार नाही. रतलामी शेव, कच्चा कांदा आणि हलकं लिंबूचा रस टाकून हे पोहे सर्व्ह केले जातात.
5/ 7
आबू रोड रेल्वे स्टेशनची रबडी - राजस्थानच्या आबू रेल्वे स्टेशनवर तुम्हाला प्रत्येकाच्या हातात रबडीची प्लेट दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. या रबडीला दुसरा कोणताच पर्याय नाही. तुम्हीदेखील लगेच ही रबडीची प्लेट घ्या आणि तुमचा प्रवासाचा आनंद द्विगुणित करा
6/ 7
कालिकत स्टेशनचा कोझिकोडन हलवा - केरळच्या कालिकत स्टेशनवरील कोझिकोडन हलवा विविध आकार आणि रंगांमध्ये मिळतो. हा असा पदार्थ आहे, ज्याचा स्वाद तुमच्या जिभेवर रेंगाळत राहिल. पूर्ण शहरात ही स्वीट डिश मिळते, मात्र स्टेशनवर तुम्हाला बेस्ट हलवा मिळेल.
7/ 7
मदुरई स्टेशनचा मद्दुर वडा - कर्नाटकच्या मदुरईला जाण्याची संधी कधी मिळाली तर तिथला क्रिस्पी मद्दुर वडा खायला विसरू नका. हा इतका टेस्टी असतो की संध्याकाळी चहाच्या वेळेला तुम्हाला या वड्याची आठवण जरूर येईल.