

भारतात सुरू असलेल्या कोरोना लशीच्या (Corona Vaccine) ट्रायलकडे प्रत्येकाचे डोळे लागून राहिले आहेत. अशात आता भारतातील पहिली स्वदेशी कोरोना लशीबाबत आनंदाची बातमी समोर येत आहे.


भारत बायोटेकने (Bharat Boiotech) तयार केलेली कोवॅक्सिनचं (Covaxin) आता तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू होणार आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DGCI - Drug controller general of india) तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलला मंजुरी दिली आहे.


पुढील महिन्यात तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू होणार आहे. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब आणि आसाममध्ये हे ट्रायल करण्याचा विचार आहे.


तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलसमध्ये 25 हजार पेक्षा जास्त लोकांचा समावेश केला जाऊ शकतो. या लोकांना 28 दिवसांत लशीचे दोन डोस दिले जातील.


फेब्रुवारीपर्यंत या लशीच्या शेवटच्या टप्प्यातील ट्रायलचे परिणाम येण्याची आशा आहे. सर्व काही सुरळीत असेल तर लगेच लशीला परवानगी देऊन ही लस बाजारात आणली जाईल.


इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चसह (Indian council of medical research) भारत बायोटेकने तयार केलेली ही लस आहे.