Home » photogallery » lifestyle » INDIA SETS ASIDE RS 500 BILLION FOR CORONA IMMUNIZATION PER PERSON RS 147 PER SHOT OF CORONA VACCINE MHPL
भारतात स्वस्तात मिळणार CORONA VACCINE; पाहा एका डोससाठी किती रुपये द्यावे लागणार
निवडणूक जाहीरनाम्यात मोफत कोरोना लशीचा (corona vaccine) उल्लेख केल्यानंतर आता मोठी माहिती समोर आली आहे.
|
1/ 7
भारतात सध्या तीन कोरोना लशींचं ट्रायल सुरू आहे. भारत बायोटेक-आयसीएमआर, सीरम इन्स्टिट्युट-ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रेझेनका आणि झायडस कॅडिला या लशींचं ट्रायल होतं आहे.
2/ 7
भारतातील कोरोना लशींचं ट्रायल परिणामकारक असल्याचं दिसून आलं आहे, पुढील वर्षातच या लशी उपलब्ध होईल अशी आशा व्यक्त केली जाते आहे.
3/ 7
दरम्यान या लशींची भारतात किंमत किती असेल असा प्रश्न उपस्थित होतो आहे. भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात मोफत कोरोना लशींचा उल्लेख करण्यात आल्यानंतर आता मोदी सरकारने या लशीसाठी बजेट निश्चित केलं आहे.
4/ 7
केंद्र सरकारने भारतातील कोरोना लशीकरणासाठी 500 अब्ज बजेट ठरवलं आहे.
5/ 7
भारताची लोकसंख्या सध्या 1.3 अब्ज आहे. त्यानुसार लशीचा अंदाजे खर्च प्रति व्यक्ती 6 ते 7 डॉलर्स म्हणजे 441 ते 515 रुपयांच्या दरम्यान असेल.
6/ 7
दोन ते तीन डॉलर्स म्हणजे 147 रुपये ते 220 रुपये असे लशीचं स्टोरेज आणि वाहतुकीसाठी लागतील.
7/ 7
एका डोसची किंमत 2 डॉलर म्हणजे 147 रुपये असेल. एका व्यक्तीला लशीचे दोन डोस लागतील.