मासिक पाळीच्या (Periods) काळात महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेकदा शारीरिक त्रासाबरोबरच मानसिक त्रास देखील मोठ्या प्रमाणात होतो. या काळात अनेक महिलांना क्रॅम्प (Cramp) येतात तर काही महिलांना याचा भयंकर त्रास होतो. पण या त्रासातून देखील महिलांना सुटका मिळू शकतो. या काळात महिलांनी आपल्या आहारावर देखील लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे.
मुंबईतील न्यूट्रीशनिस्ट (Nutritionist) प्रिया कथपाल यांनी याविषयी माहिती दिली असून या काळात महिलांनी काय खावं आणि काय खाऊ नये याविषयी माहिती दिली आहे. महिलांनी या अवघड दिवसांमध्ये आपल्या आहारात या पदार्थांचा समावेश केल्यास नक्कीच आराम मिळणार आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांची माहिती सांगणार आहोत.
डार्क चॉकलेट - या काळात महिलांचा मूड सतत बदलत असल्याने चॉकलेटचं सेवन फायदेशीर ठरतं. मूड कंट्रोलमध्ये राहण्यासाठी आणि आराम मिळण्यासाठी डार्क चॉकलेटचे(Dark Chocolate) सेवन करावं. या प्रकारच्या चॉकलेटमध्ये साखरेचं प्रमाण कमी असल्यानं तुम्हाला अराम मिळतो. परंतु व्हाईट चॉकलेटचे सेवन टाळावे. त्या चॉकलेटमधे साखरेचे प्रमाण जास्त असल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो.