मानवाच्या शरीरात जोपर्यंत प्राण आहे, तोपर्यंतचं त्यांचं अस्तिव आहे. प्राण निघून गेल्यानंतर मृत शरीरासोबत अनेक धार्मिकविधी केल्या जातात. आणि शेवटी आपआपल्या धर्मानुसार त्या ममृतं शरीराचा अंत्यविधी करण्यात येतो. जगात अनेक प्रकारच्या अंत्यविधी केल्या जातात. ते पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. जास्तीत-जास्त अंत्यविधी ह्या अतिशय शास्त्रीय पद्धतीने तसेच भौतिक वातावरण यानुसार केल्या जातात.
हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मात मृतदेह लाकडांच्या खाली ठेऊन अग्नी देऊन जाळला जातो. मात्र या तिन्ही धर्मांत मृतदेह पुरला सुद्धा जातो. लहान मुलांच्या मृतदेहाला पुरण्यात येतं. काही ठिकाणी मृतदेहाचं पाण्यात सुद्धा विसर्जन केलं जातं होतं. सध्या या मृतदेहांना इलेक्ट्रोनिक प्रक्रीयेद्वारे अग्नी दिला जातो. या सर्वांच्या पाठीमागे एक कारण स्पष्ट आहे.आणि ते म्हणजे ज्या वेळी जी सुविधा उपलब्ध असते त्याचा त्या धर्मात समावेश केला जातो.
पारसी धर्मामध्ये मृतदेहांना ना जाळलं जातं ना पुरलं जातं. याठिकाणी मृतदेहांना उघड्यावर टाकलं जातं. त्यांना गिधड येऊन खाऊन जातात. मात्र काही वर्षांपासून गिधाडंची संख्या कमी झाल्यामुळे याठिकाणी सुद्धा मृतदेहांना पुरलं जातं, तसेच या ठिकाणी सौरउर्जेच्या तबकडी बसविल्या आहेत त्या मृतदेहांना जाळून राख करतात.
मेक्सिको, श्रीलंका, चीन, तीब्बत, थायलंड याठिकाणी सुरुवातीला मृतदेहांना मसाला लाऊन, घरातील एखाद्या कोपऱ्यात ठेवण्यात येतं होतं. हे मृतदेह कधी ना कधी परत जिवंत होईल असं यापाठीमागे कारण होतं. खोदकामात सापडलेली असे काही मृतदेह अभ्यासासाठी ठेवण्यात आली आहेत. ते 3500 वर्ष जुनी असल्याचं सांगण्यात येतं.