

देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट अधिक भयंकर असल्याचं सांगितलं जातं आहे. या लाटेचा संसर्गाचा वेग अधिक आहे, शिवाय त्यात नवा स्ट्रेनही आढळलेला आहे.


कोरोनाची दुसरी लाट, बदलता स्ट्रेन यासह त्याची लक्षणंही बदलली आहे. कोरोनाची आता नवी लक्षणं समोर येत आहेत.


सर्दी-खोकला-ताप ही कोरोनाची लक्षणं आहेत असंच तुम्हाला वाटत असेल. त्यामुळे याशिवाय इतर काही लक्षणं दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करत असाल तर सावध राहा.


कोरोना आता शरीराच्या वेगवेगळ्या अंगावर परिणाम करतो आहे. विशेषतः फुफ्फुसाप्रमाणेच आतड्यांवरही परिणाम करतो आहे.


पोटदुखी, उलटी, डायरिया, अंगदुखी अशी तक्रार घेऊन आलेले 40 टक्के रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.


दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील डॉ. सौमित्र रावत यांनी न्यूज १८ शी बोलताना सांगितलं, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वेगवेगळे स्ट्रेन समोर आले आहेत. डबल म्युटेशन, दक्षिण आफ्रिकन स्ट्रेन, यूके स्ट्रेन, ब्राझील स्ट्रेन समोर आले आहेत. प्रत्येक स्ट्रेनमध्ये वेगवेगळी लक्षणं पाहायला मिळत आहेत.