वयाची पहिली दहा वर्षे वयाप्रमाणे प्रथिनं (प्रोटिन्स), कर्बोदकं (कार्बोहायड्रेट्स), गरजेचं ओमेगा फॅटी अॅसिड्स, जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन्स), क्षार (मिनरल्स) यांची गरज असते. म्हणूनच आहारामध्ये दूध, कडधान्ये, फळे, भाज्या, अंडी यांचा समावेश असावा. त्यांच्यात कमतरता निर्माण होत नाही. मुलंचा आहारात काय असावं याबाबत नवी मुंबईतल्या खारघरच्या मदरहूड रुग्णालयातील सल्लागार बालरोग तज्ज्ञ डॉ, पीयुष रणखांब यांनी मार्गदर्शन केलं आहे. (फोटो सौजन्य - Getty Images)
आपल्या शरीराच्या पेशींच्या जडण- घडणीमध्ये प्रथिनंच सर्वाधिक उपयोगी पडतात. चयापचयाचा वेग, शरीराच्या वाढीचा वेग यांवर नियंत्रण ठेवून विकास नियंत्रित करणे, अशी प्रमुख कामे करणाऱ्या प्रथिनांना संप्रेरक प्रथिने असं म्हणतात. आहारात शेंगदाणे, मका, ताज्या भाज्या आणि फळं यासारख्या पदार्थांचा समावेश करा. दुधातही पुरेसे प्रथिने असतात त्यामुळे मुलांच्या आहारात दुधाचा समावेश करा. (फोटो सौजन्य - AFP Relaxnews)