

भारतात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीला आपात्कालीन मंजुरी देण्यात आली आहे. कोविन अॅप मार्फत संपूर्ण लसीकरण कार्यक्रम राबवला जाणार आहे. 16 जानेवारीपासून भारतात कोरोना लसीकरण सुरू होणार आहे.


सुरुवातीच्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांचं लसीकरण केलं जाणार आहे. यासाठी मोदी सरकारनं प्राधान्यक्रम ठरवला आहे. सुरुवातीला 3 कोटी आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्सना लस दिली जाईल. त्यानंतर 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती आणि इतर आजार असलेल्या व्यक्ती अशा 27 कोटी नागरिकांना ही लस दिली जाईल.


तुम्हाला कोरोना लस घ्यायची असल्यास त्याआधी डॉक्टर तुम्हाला काही प्रश्न विचारतील या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं (SII) फॅक्टशीट जारी केलं आहे. या फॅक्टशीटमध्ये याबाबत माहिती दिली आहे.


तुम्हाला कोणतं औषध, पदार्थ, लशीची किंवा कोव्हिशिल्डमध्ये वापरलेल्या घटकांची अॅलर्जी तर नाही ना?


तुम्हाला रक्तासंबंधी कोणता आजार किंवा समस्या तर नाही ना? किंवा तुम्ही रक्त पातळ होण्याची औषधं तर घेत नाहीत ना?