Diabetes असेल तर या भाज्या चुकून पण खायच्या नसतात; कंट्रोलमध्ये नाही राहणार शुगर
Diabetes Control Tips: ज्या लोकांना मधुमेहाचा (Diabetes) त्रास आहे. त्यांना विविध आजार होण्याचीही शक्यता जास्त असते. लोक मधुमेहापासून बचावासाठी आणि रक्तातील साखरेची (Blood Sugar level) पातळी नियंत्रित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. लाईफस्टाईल (Lifestyle) बदलून आहारात बदल करून आणि मेडिकेशने डायबेटीस (Diabetes) कंट्रोल (Control) करता येतो. मधुमेहाच्या रुग्णांनी रोजच्या आहाराकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होण्याचा धोका असतो. काही गोष्टी मधुमेह असेल तर खाणे घातक ठरू शकते. जाणून घेऊया अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या मधुमेह असेल तर खाऊ नयेत.
1. बटाटा - बटाट्याला भाज्यांचा राजा म्हटले जाते, पण त्यात स्टार्च आणि कार्बोहायड्रेट्स खूप जास्त प्रमाणात आढळतात. त्यामुळे मधुमेहींनी बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि चिप्स यांसारखे बटाट्याचे पदार्थ खाऊ नयेत.
2/ 4
2. कॉर्न - मका खाण्याचे कितीही फायदे असले तरी मधुमेहाच्या रुग्णांनी त्यापासून दूर राहणेच चांगले. अर्धा कप मक्यामध्ये सुमारे 21 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आढळतात, जे मधुमेहींसाठी हानीकारक ठरू शकतात.
3/ 4
3. हिरवे वाटाणे - हिरवे वाटाणे कार्बोहायड्रेट्स आणि स्टार्चचा समृद्ध स्त्रोत मानला जातो, त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने मधुमेहाच्या रुग्णांच्या पचनसंस्थेवर परिणाम होतो, म्हणून मधुमेहामध्ये ते न खाणे चांगले.
4/ 4
4. रताळे - रताळे ही एक उत्तम भाजी आहे यात शंका नाही, पण त्यात कार्बोहायड्रेट्स आणि बीटा कॅरोटीन मुबलक असल्याने मधुमेही रुग्णांसाठी ती घातक आहे. त्याची चवही गोड असते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)