

बँकेची वेबसाइट (Bank Website)- तुमचं खातं असलेल्या बँकेचे वेबसाइट किंवा netbanking link शोधण्यासाठी google करू नका. तुम्हाला ही लिंक किवा वेबसाइट URL माहिती असेल तर थेट ब्राउजरवर टाइप करा. कारण ऑफिशिअल वेबसाइटच्या ऐवजी तुम्ही चुकीची वेबसाइट उघडलीत तर हॅकर तुमची महत्त्वाची माहिती चोरतील आणि तुमचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं.


Customer Care नंबर: बिझनेस लिस्टिंग करणारे कधीतरी चुकीचे कस्टमर केअर नंबर किंवा लिंक्स देऊन यूजर्सना गंडा घालतात. मोठ्या कंपन्यांच्या नावाने फसवणूक झालेल्या घटना अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे कंपन्यांचे नंबर google वर शोधू नका. त्याऐवजी कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाइटवरून त्यांचा नंबर घ्या.


Apps आणि Software download : कुठलंही नवं अॅप डाउनलोड करण्याआधी नेमकं ऑफिशिअल व्हर्जन कोणतं हे माहिती करून घ्या. Google Play किंवा ऑफिशिअल अॅप स्टोअरचा वापर करूनच नवं application डाउनलोड करा. सारख्या नावाची फेक अॅप असतात. ती डाउनलोड केली तर malware किंवा व्हायरस येऊ शकतो.


औषधं किंवा आजाराची लक्षणं: आजारी पडलात किंवा बरं वाटत नसेल तर डॉक्टरला विचारण्याआधी Google करण्याची सवय वाईट. यातून चुकीची माहिती मिळण्याची शक्यताच जास्त असते. त्यातून google वर शोधून औषधं तर मुळीच घेऊ नका.


गुंतवणूक आणि स्टॉक मार्केटचा सल्ला : Google करून गुंतवणूकीचे किंवा स्टॉक मार्केटचे अपडेट्स घेत असाल तर सावधान. कारण यातला ऑथेंटिक सोर्स कोणता हे कळायला गुगलकडे मार्ग नसतो.


सोशल मीडिया लॉगइन पेज : सोशल मीडिया अॅक्सेस करताना थेट त्याची URL टाइप करणं योग्य. कारण लोकप्रिय सोशल मीडिया साइट्सची अनेक फेक URL असतात. तिथे तुमचं साइन इन झालं तर वैयक्तिक माहिती लीक होऊ शकते.


. ई कॉमर्स वेबसाईट्स : e commerce किंवा e shopping वेबसाइट्सवर ऑफर असतात. पण अशा फेक ऑफर देणाऱ्या काही वेबसाइट्स आहेत. Google वर दिसणाऱ्या या स्पॅम वेबसाइट्सवरच्या ऑफर्सना भुलून तुम्ही क्लिक केलंत तर बँकिंगशी संबंधित डेटा तसंच तुमचे पासवर्डसुद्धा लीक होऊ शकतात.


फ्री अँटी व्हायरस : Google वर अँटीव्हायरस अॅप किंवा सॉफ्टवेअर सर्च केलंत तर अनेक पर्याय येतात. त्यातून खरं, ऑथेंटिक अॅप किंवा सॉफ्टवेअर शोधणं अवघड जाईल. तुम्ही चुकून जरी फेक अॅप डाऊनलोड केलंत तरी मालवेअर घुसण्याची शक्यता आहे. एकदा मालवेअर किंवा व्हायरस आला की तुमच्या सिस्टीममधून महत्त्वाची माहिती धोक्यात येईल.