ज्या शहरात जाताय तिथले कोरोनासंबधीचे नेमके नियम आधी समजून घ्या. जाण्याआधी कोरोना टेस्ट करवून घेतलीत तर ते चांगलं जास्त होईल. स्वतःच्या कारनं प्रवास करणं हा जास्त सुरक्षित पर्याय असेल. हवाई मार्गाद्वारे प्रवास करताना सोशल डिस्टंसिंगचं पालन नक्की करा. एकावेळी कमीतकमी लोकांना भेटण्याचा प्रयत्न करा कुटुंब आणि मित्र-मैत्रिणींना भेटतानाही तासंतास एकत्र राहण्याऐवजी कमी वेळेसाठीच एकत्र रहा. जिथे जाताय तिथल्या वैद्यकीय सुविधा आणि संबंधित गोष्टींची आधीच माहिती करून घ्या. लोकांना भेटताना मास्क आणि सॅनिटायजर वापरण्याबाबत हयगय अजिबात करू नका.