भारतीयांसाठी आदर्श वजनाच्या मानकांमध्ये आता बदल झाला आहेत. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ न्यूट्रिशनने (NIN) भारतीयांच्या वजन प्रमाणात 5 किलो वाढ केली आहे. 2010 मध्ये भारतीय पुरुषांचं प्रमाणित वजन 60 किलो आणि स्त्रियांचं प्रमाणित वजन 50 किलो होतं. आता भारतीय पुरुषांचं प्रमाणित वजन 65 तर स्त्रियांचं प्रमाणित वजन 55 किलो करण्यात आलं आहे. वजनासह उंचीच्या मानकांमध्येही बदल करण्यात आले आहेत. 2010 साली पुरुषांंची प्रमाणित उंची 5.6 फूट तर महिलांची उंची 5 फूट होती. आता पुरुषांंची प्रमाणित उंची 5.8 तर महिलांची उंची 5.3 फूट करण्यात आली आहे. वजन आणि उंचीच्या गुणोत्तरानुसार बॉडी मास्क इंडेस्क (BMI) काढलं जातं. आता या नव्या पॅरामीटर्सवर सामान्य बीएमआय काढलं जाईल. भारतीयांचा पौष्टीक आहार वाढला आहे, त्यामुळेच बॉडी मास्क इंडेक्समध्ये बदल करण्यात आले आहेत. दहा वर्षांपूर्वी फक्त शहरी भागातील लोकांचा समावेश होता, आता ग्रामीण भागातील लोकांचाही समावेश करून हे नवं मापदंड तयार करण्यात आलं आहे.