होम » फ़ोटो गैलरी » कोरोना
1/ 5


कोरोनाव्हायरसची लागण झाल्यानंतर त्या रुग्णाच्या शरीरात त्याविरोधात अँटिबॉडीज तयार होतात आणि या अँटिबॉडीज कोरोनाशी लढतात आणि पुन्हा संक्रमण होण्यापासून बचाव करतात.
2/ 5


मात्र कोरोनाविरोधातील या अँटिबॉडीज शरीरात किती वेळ राहतात आणि कोरोनापासून किती वेळ संरक्षण देतात असा प्रश्न उपस्थित होतो.
3/ 5


नुकत्याच मुंबईतील जेजे रुग्णालयाने (JJ hospital) केलेल्या अभ्यासात कोरोनाविरोधातील अँटिबॉडीज 50 दिवसांतच कमी होत असल्याचं दिसून आलं आहे.
4/ 5


तर आता आइसलँडमधील बायोटेक कंपनी डिकोड जेनेटिक्सने केलेल्या अभ्यासानुसार कोरोनाची लागण झाल्यानंतर तयार होणाऱ्या अँटिबॉडीज कमीत कमी चार महिन्यांपर्यंत इम्युनिटी देऊ शकतात. (फोटो सौजन्य - एएफपी)