या जगातील सजीवांचा विकास अत्यंत पद्धतशीर मार्गाने झाला आहे. जगाच्या इतर प्राण्यांच्या तुलनेत मनुष्य का आणि कसा विशेष आहे हे जाणून घेण्यासाठी वैज्ञानिक बराच काळ प्रयत्न करत आहेत. आता शास्त्रज्ञांनी एक नवीन तंत्रज्ञान विकसित केलं आहे. त्यानुसार, वैज्ञानिकांनी आत्ताच्या काळातल्या मनुष्याचा डीएनए आणि आपल्या नामशेष झालेल्या पूर्वजांचा डीएनएची अचूक तुलना केली आहे.