

आजकालच्या तरुण पिढीला नोकरी करण्यापेक्षा उद्योगात जास्त रस असतो. स्वत:चा नवीन उद्योग सुरु करण्यासाठी ते हातातली नोकरीदेखील सोडायला तयार असतात. अशा तरुणांना उद्योग करणं सोपं वाटंतय. पण स्वत:चा नवीन उद्योग सुरु करणं नोकरी करण्याइतक किंबहूना त्याहून अवघड असतं. आज आम्ही तुम्हाला व्यवसायात यशस्वी होण्याचे पाच टीप्स देणार आहोत.


तीन वर्षांचे बजेट महत्त्वाचे- होतकरू तरुणांना तंत्रज्ञानाचे ज्ञान असल्याने त्यांना यामध्येच उद्योग सुरु करण्यात अधिक रस असतो. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या आकडेवारीनुसार देशातील १९ हजार तरुणांनी त्यांच्या उद्योगाची सुरुवात तंत्रज्ञानाने केली आहे. ही देशातील तिसरी सर्वात मोठी संख्या आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन उद्योग सुरु करणार असाल तर तुमच्याकडे किमान तीन वर्षांचे बजेट असले पाहिजे.


खर्च कमी करा- नवीन उद्योग सुरु केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला लगेच इनकम सुरु होईल असे काही नाही, त्यामुळे सुरुवातीच्या काळात तुम्ही कमी खर्च करण्याकडेच लक्ष केंद्रीत करा.


योग्य विमा घ्या- जरी तुम्हाला नोकरी करताना विम्याची गरज नाही भासली, तरी स्वत:च्या उद्योगात मात्र त्याची गरज भासू शकते. तुम्ही तुमचा उद्योग एकट्याच्या भरवशावर करत असात तर तुम्हाला नक्कीच योग्य विम्याबद्दल विचार करावा लागेल.


भविष्यासाठी गुंतवणूक करा- जर तुमच्याकडे म्युचुअल फंडसारखे गुंतवणूकीचे पर्याय असतील तर तुमच्या भविष्यासाठी ते चांगलं ठरणार आहे.