Baby Jesus ला मास्क, Bubbles मध्ये Santa Claus; कोरोना काळातील Christmas
यावर्षी कोरोनाच्या (covid 19) संकटाचा सर्व सणांवर प्रभाव पडला आहे. भारतासह जगभरात यावर्षी साजरे होणारे सण कोरोनाच्या सावटाखालीच साजरे होत आहेत. काही दिवसांवर ख्रिसमस (Christmas) सण येऊन ठेपला आहे. कोरोनाच्या महासाथीत नाताळची कशी तयारी सुरू आहे पाहुयात.


एलबोर्ग प्राणिसंग्रहालय नाताळच्या सणानिमित्त खुलं झालं असून येथे बायो बबल फुग्यात (Santa Claus bubble) सांता क्लॉजच्या रूपात बसलेली एक व्यक्ती लहान मुलांशी हात मिळवताना दिसते आहे. कोरोनाच्या संकाटामुळे सगळीकड़े नागरिक फेस मास्क आणि सुरक्षा साधनांचा वापर करून सोशल डिस्टंन्सिंग पाळताना दिसून येत आहेत. (Photo: Reuters)


दुकानात ठेवलेल्या सातांच्या पुतळ्यालादेखील मास्क घातलेला दिसून येत असून त्या दुकानासामोरून जाताना महिला दिसते आहे. (Photo: Reuters)


मेक्सिको शहरामध्ये दुकानांमध्ये विक्रीस असलेल्या लॉर्ड जिजसच्या रूपातील बाहुल्यांना देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेस मास्क आणि फेस शिल्ड घालण्यात आले आहेत. आपल्याकडेही यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशाच्या मूर्ती तयार केल्या होत्या. (Photo: Reuters)


ब्राझीलमधील साओ पावलो येथे लूमिना फेस्टिव्हलला (Luminna Fest) भेट देण्यासाठी जाताना गाडीतून लाइट्सकडे बघताना लहान मुले. (Photo: Reuters)


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनमधील वेस्ट सक्सेस येथे जेम्स स्मिथ (James Smith) या कलाकाराने तयार केलेले होप (HOPE ) अशी अक्षरं लाइटमध्ये दिसत आहे. (Photo: Reuters)