वजन कमी करण्यासाठी कडक डाएट आणि व्यायामाची नाही गरज, फक्त वापरा या सिंपल ट्रिक्स
वजन वाढलं की प्रत्येक जण चिंतेत पडतो. वजन कमी करण्यासाठी मग वर्कआऊट्स, डाएटिंग हे सर्व करावं लागतं. पण याशिवायही काही सिंपल ट्रिक्सनी वजन होऊ शकतं कमी
|
1/ 7
वजन वाढलं की प्रत्येक जण चिंतेत पडतो. वजन कमी करण्यासाठी मग वर्कआऊट्स, डाएटिंग हे सर्व करावं लागतं. पण आम्ही तुम्हाला सांगतो, आता याची अजिबातच गरज नाही. तुम्ही काही ट्रिक्स वापरून झोपेतच आपलं वजन कमी करू शकता.
2/ 7
आपण रात्री झोपतो, तेव्हा शरीरात बरेच बदल होत असतात. पूर्ण सिस्टिम रिपेअर होते. म्हणजे कधी कमी झोप लागली तर दुसऱ्या दिवशी बरं वाटत नाही. यामुळे हार्मोन्सवरही परिणाम होतो. त्याचा परिणाम वजनावर होतो.
3/ 7
त्यासाठीच झोप महत्त्वाची असते. म्हणून तुम्ही आॅफिसचं काम घरी घेऊन येऊ नका. नीट झोप लागली की तुमचं मेटॅबोलिझम व्यवस्थित राहातं. वजन वाढत नाही.
4/ 7
आपण रात्रीचे 8 तास गाढ झोपलो तरी शरीराच्या प्रक्रिया सामान्यपणे सुरू असतात. शरीराल उर्जेची गरज असते. मग ही उर्जा शरीर अतिरिक्त चरबी बर्न करून घेतं. त्यामुळे व्यवस्थित झोप काढली की नक्कीच वजन कमी होतं.
5/ 7
अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन अनुसार ज्या व्यक्ती चांगली झोप घेतात त्या 20 टक्के कॅलरीज बर्न करतात.
6/ 7
नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ चाइल्ड हेल्थ अॅण्ड ह्युमन डेव्हलपमेंट, मॅरीलँड आणि स्टॅनफर्ड युनिवर्सिटी यांनी केलेल्या संशोधनानुसार रात्री कमी झोप मिळाली की शरीराची सिस्टिम बिघडते. शरीरात कोर्टिसोल हार्मोन वाढायला लागतं. त्यानं जास्त भूक लागते. मग ती व्यक्ती जास्त खाते आणि वजन वाढतं.
7/ 7
रात्री झोपताना सगळे कपडे काढून झोपलं तर शरीराचं तापमान थंड राहतं. त्यामुळे कॅलरीज जास्त बर्न होतात.