सर्वसाधारणपणे पौष्टिकतेने युक्त आहार मुलांची शारीरिक वाढ करण्यासाठी गरजेचा असतो. पण मुलांच्या मानसिक जडणघडणीत शिक्षणाची भूमिका महत्त्वाची असल्याचे दिसते. अशा परिस्थितीत काही शैक्षणिक उपक्रमांच्या मदतीने मुलांच्या मानसिक वाढीला चालना मिळू शकते. जाणून घेऊया मुलांची मानसिक वाढीसाठी काही कॉमन टिप्स, ज्याचा अवलंब करून पालक मुलांची मानसिक वाढ चांगली करू शकतात.
आउटडोर एक्टिविटी करा - मुलांना त्यांची सामाजिक कौशल्ये विकसित करण्यासाठी उद्यानात फिरायला घेऊन जा. यामुळे मुले नवीन मित्र बनवतील, लोकांशी संवाद साधायला आणि निसर्गाच्या सान्निध्यात जायला शिकतात. तसेच मुलं त्यातून अनेक नवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांची मानसिक वाढ वेगाने होऊ लागते. फक्त घरात राहणं किंवा एकटेच खेळणे नेहमी योग्य नाही.
योग्य आणि अयोग्य यातील फरक सांगा - मुलांना हुशार बनवायचे असेल तर त्यांना चांगले आणि वाईट यामधील फरक समजावून सांगणे खूप महत्त्वाचे आहे. तथापि, लहान वयात मुलांना योग्य आणि अयोग्य शिकवणे कठीण काम असते. यासाठी तुम्हीच रोल मॉडेल बनून मुलांना जगाची ओळख करून देण्याचा प्रयत्न करा. यामुळे, मूल तुम्ही शिकवलेले कधीही विसरणार नाही आणि चांगले आणि वाईट मधील फरक देखील सहज समजू लागेल. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)