दूध आणि मधाचा मास्क : पोषक तत्वांनी युक्त दूध कोरडी त्वचा दूर करण्यासाठी प्रभावी ठरतं. दूध आणि मधापासून बनवलेला फेस मास्क त्वचेची जळजळ आणि खाज सुटणं कमी करण्याबरोबरच आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी चांगला आहे. चेहऱ्यासाठी दुधाची पावडर वापरा. 2 चमचे मिल्क पावडरमध्ये 1 चमचा मध मिसळून चेहऱ्याला लावा. पॅक सुकल्यावर चेहरा पाण्याने धुवा.
खोबरेल तेल वापरा : खोबरेल तेल त्वचेवर लावल्याने त्वचेचा कोरडेपणा तर दूर होईलच. पण त्वचेचा संसर्गही टाळता येईल. रोज रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल लावल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. त्याच वेळी त्वचेमध्ये ओलावा बराच काळ टिकून राहतो. (अस्वीकरण: या लेखात दिलेल्या माहितीची मराठी न्यूज18 हमी देत नाही. हे लागू करण्यापूर्वी कृपया संबंधित तज्ज्ञांशी संपर्क साधा.)