काजळ लावण्याआधी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे टोनरनं चेहरा साफ करणं. यामुळे चेहऱ्यावरील तेलकटपणा जाईल आणि काजळ पसरणार नाही. तुमच्या चेहऱ्यावर घाम जास्त येत असेल, तर तुम्ही डोळ्यांजवळ बर्फ चोळा यामुळेही काजळ पसरणार नाही डोळ्यांच्या बाहेरील कोपऱ्यांवरही पावडर लावा, ज्यामुळे तो भाग ड्राय राहिल त्यानंतर त्यावर काजळ लावा काजळ पसरू नये, यासाठी त्याला सेट करायला हवं. काजळ सेट करण्यासाठी त्यावर ब्लॅक आयशॅडो पावडर आणि डोळ्यांखाली ट्रान्सलूसेंट पावडर लावा काजळ लावल्यानंतर वॉटर लाईनच्या बाहेर हलकासा आयशॅडो लावा.