कोरोना लॉकडाऊनमध्ये अचानक का आणि कसं वाढलं तुमचं वजन? सर्वेक्षणात समोर आली कारणं
एका सर्वेक्षणात कोरोना लॉकडाऊनमध्ये वजन वाढण्याची (corona lockdown weight gain) चार प्रमुख कारणं समोर आली आहेत.
|
1/ 7
कोरोना लॉकडाऊनमध्ये कोरोनाव्हायरसपासून बचाव करता करता सर्वांची जीवनशैली बदलली आहे. या मुळे दिसून येणारा एक परिणाम म्हणजे वाढतं वजन. कोरोना लॉकडाऊनमध्ये अनेकांचं वजन वाढलं आहे. हे वजन का आणि कसं वाढलं याचा अभ्यास संशोधकांनी केला आहे.
2/ 7
यूकेतील स्लिमिंग वर्ल्ड (Slimming World) या वेट लॉस ऑर्गनायझेशनने हेल्थ अँड वेलबिंग स्टडी अंतर्गत एक सर्वेक्षण केलं. यामध्ये लोकांना आरोग्य, मूड, आहार, मद्यपान, शारीरिक कार्य आणि वजन व्यवस्थापनाबाबत विचारणा करण्यात आली.
3/ 7
9 एप्रिल ते 16 मेदरम्यान झालेल्या या सर्वेक्षणात स्लिमिंग वर्ल्डच्या 222 सदस्य आणि 637 इतर नागरिक अशा एकूण 800 प्रौढ व्यक्तींचा या सर्वेक्षणात सहभाग होता.
4/ 7
1 ते 4 सप्टेंबर आयोजित युरोपियन अँड इंटरनॅशनल काँग्रेस ऑन ऑबेसिटी (ECOICO) मध्ये हे सर्वेक्षण मांडण्यात आलं.
5/ 7
इतर सर्वसामान्य नागरिकांपेक्षा स्लिमिंग क्लबमार्फत वजन व्यवस्थापनासाठी मदत घेणाऱ्यांचं वजन मात्र या कालावधीत कमी झालं, त्यांनी भरपूर व्यायाम केला आणि त्यांचं इतर आरोग्यही नीट होतं, असं या सर्वेक्षणात दिसून आलं.
6/ 7
ज्या लोकांचं वजन वाढलं त्यांना ते नियंत्रणात ठेवणं कठीण वाटलं याची चार मुख्य कारणं या सर्वेक्षणातून समोर आली.
7/ 7
एक म्हणजे दुकानात जाऊन हेल्दी फूड खरेदी करणं अशक्य होतं, दुसरं म्हणजे कंटाळवाणं वाटणं आणि घरी राहिल्याने सतत काही ना काही खात राहणं, तिसरं म्हणजे भरपूर स्ट्रेस आणि एन्झायटी यामुळे आरामात खाणं, चौथं म्हणजे जास्तीत जास्त बसून राहणं आणि कमीत कमी व्यायाम करणं.