High Heels घालायच्या आहेत, मग 'या' टिप्स जरूर वाचा
हील्स (Heels) सॅण्डल म्हणजे उंच टाचांच्या चपला अनेक महिलांना आवडतात. हील्स घातल्याने स्टायलिश लूकही येतो, मात्र हील्स या स्टायलिश लूकसह वेदनाही देतात. त्यामुळे तुमच्यासाठी या काही Tips
|
1/ 5
स्ट्रेप्स किंवा बकल्स असलेली हील्स खरेदी करा, यामुळे पायांना सपोर्ट मिळेल, पायांना वेदना होणार नाहीत
2/ 5
पेन्सिल हील्स घालणं अवघड वाटत असेल तर चंकी किंवा ब्लॉक हील्स वापरा. यामुळे तुमचा बॅलेन्स चांगला राहतो आणि पायांवर ताणही कमी येतो
3/ 5
नवीन फूटवेअर घेतल्यानंतर सर्वात आधी मोज्यांसह वापरा. शिवाय घरात घालून चाला. यामुळे फूटवेअर थोडे सैल होतील आणि पायांना जखम होणार नाही.
4/ 5
कपड्यांप्रमाणे चपलांचेही ब्रॅण्डसनुसार वेगवेगळे आकार असतात. त्यामुळे फूटवेअर तुमच्या पायात योग्यप्रकारे फिट होतं आहे की नाही ते तपासून घ्या.
5/ 5
हील्स घातल्यानंतर आपल्या चालीवरही लक्ष ठेवा. हील्स घातल्यानंतर आपली चालण्याची पद्धत बदलते, त्यामुळे तुमच्या पायात वेदना होतात.