कुणीतरी आठवण काढतं म्हणून नाही तर महिलांना लागणारी उचकी गंभीर आजाराचं लक्षण
उचकीचा (Hiccups) संबंध नेहमी आठवणीशी जोडला जातो. वैद्यकीयदृष्ट्या उचकी लागण्याची बरीच कारणं आहेत. महिलांमध्ये तर हे अशा गंभीर आजाराचं लक्षण आहे जे तोच आजार असलेल्या पुरुषांमध्ये दिसत नाही.


एखाद्याला उचकी लागली की, कुणीतरी आठवण काढतं आहे वाटतं, असं आपण सर्वसामान्यपणे म्हणतो. मात्र वैद्यकीयदृष्ट्या उचकी लागण्याची अनेक कारणं आहेत. आता एका नव्या संशोधनानुसार उचकी लागणं हे महिलांमध्ये गंभीर आजाराचं लक्षण आहे.


पुरुष आणि महिला दोघांमध्ये हा आजार दिसून येतो. मात्र या आजाराच उचकीचं लक्षण फक्त महिलांमध्येच दिसून येतं, असं संशोधकांनी सांगितलं.


हा आजार म्हणजे स्ट्रोक. मानसिक गोंधळ, बोलताना समस्या, समजून घेण्यात अडचण, पाहण्यात त्रास, चालताना अडखळणं, तोल जाणं, शरीराचा समन्वय नसणं ही स्ट्रोकची सर्वसामान्य लक्षणं.


वेब एमडीच्या रिपोर्टनुसार महिलांमध्ये उचकी, छातीत वेदना, चक्कर, डोकेदुखी, शरीराचा एक भाग बधीर होणं अशी स्ट्रोकची प्राथमिक लक्षणं दिसतात.


ओहिओ स्टेट युनिव्हर्सिटी वेक्सनेर मेडिकल सेंटरमधील संशोधकांनी काही महिलांचं सर्वेक्षण केलं होतं, त्यानुसार 1000 पैकी फक्त 10 महिलांनाच या लक्षणाबाबत माहिती असते.