हेल्दी पद्धतीने करा आलेल्या पाहुण्यांचे स्वागत, ट्राय करा हे 5 हेल्दी आणि टेस्टी हर्बल टी ऑप्शन्स
चहा हे प्रत्येकाचे आवडते पेय आहे. आपल्याकडे पाहुणे आल्यानंतर सर्वात आधी त्यांच्यासाठी केला जाणारा पदार्थ म्हणजे चहा. आज आम्ही तुमच्यासाठी चहाचे काही हेल्दी आणि टेस्टी ऑप्शन्स घेऊन आलो आहोत.
बहुतेक लोक दुधासह चहा पितात, परंतु त्यात असलेले कॅफिनदेखील आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. जर तुम्हाला दीर्घायुष्यासाठी निरोगी राहायचे असेल तर तुम्ही हर्बल टीदेखील घेतली पाहिजे.
2/ 7
हर्बल टी वृद्धत्व विरोधी आहे. शरीराला डिटॉक्सिफाय करते, पचनास मदत करते, जळजळ आणि वजन कमी करते. जर तुम्हाला निरोगी रहायचे असेल तर तुमच्या आहारात या 5 हर्बल टीचा समावेश नक्की करा.
3/ 7
ग्रीन टी : ग्रीन टीमध्ये असलेले घटक वजन कमी करतात. त्याचा शरीराबरोबरच मनालाही फायदा होतो. थकवा दूर करतो. मूड फ्रेश करतो. जर तुम्हाला गॅस, अपचनाची समस्या असेल तर तुम्ही ग्रीन टी पिऊ शकता.
4/ 7
आल्याचा चहा : प्रवास करताना उलट्या, मळमळ होत असल्यास आल्याचा चहा प्या. याने पचनसंस्थाही निरोगी राहते, उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो, मायग्रेनच्या त्रासावरही आल्याचा चहा उत्तम उपाय आहे.
5/ 7
कॅमोमाइल टी : तणावमुक्त राहण्यासाठी, निद्रानाशाची समस्या टाळण्यासाठी तुम्ही हा कॅमोमाइल टी नक्की प्यावा. कॅमोमाइल चहा मेंदूमध्ये एक रसायन सोडते, जे मेंदूतील तणाव, नैराश्याशी लढण्यास मदत करते.
6/ 7
काळा चहा : काळ्या चहामध्ये फ्लेव्होनॉइड संयुगे असतात, ज्यामुळे संज्ञानात्मक कमजोरी, जळजळ, हृदयरोग, मधुमेह आणि विशिष्ट प्रकारचे कर्करोगाचा धोका कमी होतो. स्मृतिभ्रंशाची शक्यताही कमी होते.
7/ 7
ओलॉन्ग टी : एका अभ्यासानुसार, दररोज अडीच कप ओलोंग चहा प्यायल्याने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. निरोगी हृदय, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ओलॉन्ग टी फायदेशीर आहे.