व्यायाम - व्यायाम करणं आरोग्यासाठी चांगलं आहे मात्र जास्त व्यायाम तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतं. काही जणांना फिट राहण्याचं इतकं वेड असतं, की त्यासाठी जे भरपूर व्यायाम करतात, यामुळे त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. कठीण असा व्यायाम केल्यानंतर तुमच्या शरीराला थोड्या आरामाची गरज असतं. त्यामुळे व्यायामात शरीराला ब्रेक न दिल्याने तुम्हाला दुखापत तर होईलच शिवाय योग्य परिणामही दिसणार नाही.