मॅन्स्ट्रूअल कप वेगवेगळ्या साईझमध्ये येतात. ते आपल्या योनीमध्ये ठेवावं लागतं. या कपमध्ये पाळीच्या काळात होणारा रक्तस्त्राव साठतो. काही ठरावीक काळानंतर हा कप काढून स्वच्छ करावा लागतो. मॅन्ट्रूअल कप वापरताना स्वच्छतेची काळजी घ्यावी. कारण स्वच्छता न पाळल्यास योनीला संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे मॅन्ट्रूअल कप वापरताना आपले हात स्वच्छ धुवावेत.