वजन कमी करण्यासाठी प्रोटीन्सचे सेवन करताय? या चुका केल्यास करावा लागेल लठ्ठपणाचा सामना
Excessive Protein: शरीरात पेशींच्या निर्मितीसाठी प्रोटीन हा अत्यंत महत्वाचा घटक आहे.पण,म्हणून प्रमाणापेक्षा जास्त प्रोटीन घेणंही चांगलं नाही.
|
1/ 9
एका दिवसात शरीरासाठी किती प्रोटीन खायला पाहिजे माहित असणं महत्वाचे आहे. पुरुषांसाठी दररोज 56 ग्रॅम आणि स्त्रियांसाठी 46 ग्रॅम प्रोटीन आवश्यक आहे. मात्र हे प्रमाण आपल्या जीवनशैली प्रमाणे कमीजास्त होऊ शकतं.
2/ 9
एक्सरसाईज, वजन आणि वयानुसार हे प्रमाण बदलू शकतं. पण, गरजेपेक्षा जास्त प्रोटीन शरीरात गेल्यास त्याचे कोणते दुष्परिणाम होतात याचीही माहिती असायला हवी.
3/ 9
हाडं, स्नायू, त्वचा आणि केसांसाठीदेखील प्रोटीन आवश्यक असतं. शरीरातील टीशू तयार करण्यासाठी देखील प्रोटीन आवश्यक आहेत.
4/ 9
रेड ब्लड सेल्समधील ऑक्सिजन शरीरात वितरित करण्यासाठी प्रोटीन कार्य करतं. शरीरातील आवश्यक पोषक घटकांची कमतरता देखील पूर्ण करतात.
5/ 9
आहारातील प्रोटीनचा एक मोठा भाग शरीरात एंझाइम्स तयार करण्यात मदत करत असतो. जेवण पचवण्यात आणि शरीरात केमिकल्स तयार करण्यात मदत करतं.
6/ 9
प्रोटीन पचायला वेळ लागतो. बर्याच वेळा जास्त प्रमाणात प्रोटीन घेतल्यामुळे पचनाचा त्रास होतो. प्रोटीनने आपल्या पचन प्रणालीवर अतिरिक्त दबाव येतो.
7/ 9
जास्त प्रोटीनमुळे शरीरातील कार्बोहायड्रेड आणि चरबी कमी होते. त्यामुळे जेव्हा प्रोटीन पचण्यास वेळ लागतो तेव्हा शरीराची त्वरित उर्जा गरज भागवली जात नाही. परिणामी आपल्याल अशक्त येतो किंवा थकवा जाणवतो.
8/ 9
शरीरात जास्त प्रोटीन गेले तर, पचायला वेळ लागतो. त्यामुळे लूजमोशन्स होऊ शकतात. परिणामी शरीरातलं पाणीही कमी होतं.
9/ 9
वजन कमी करण्यासाठी प्रोटीन घेत असाल आणि त्याबरोबर एक्ससाईज करत नसाल तर, त्यापासून शरीरात चरबी तयार व्हायला लागते. गरजेपेक्षा जास्त प्रोटीनमुळे किडनी प्रॉब्लेमही होतात.